जळगाव शहरातील विठ्ठलपेठ परिसरातील घटना, आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लहान भावाला दुकानावर वस्तू घेण्यासाठी पाठवून जळगाव शहरातील विठ्ठलपेठ परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने कोणत्यातरी तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समोर आले आहे. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (वय-१७, रा. विठ्ठल पेठ, जळगाव) असे माहीत झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी ही अल्पवयीन मुलगी आपली आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत विठ्ठलपेठ परिसरात वास्तव्याला होती. तिने नुकतेच दहावीच्या शिक्षण पूर्ण करून शहरातील का.ऊखाजी कोल्हे येथे अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ती कोणत्यातरी तणावात होती. दरम्यान आज शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई या नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते. याचा फायदा घेत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्यावेळाने लहान भाऊ दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने आरडाओरड करत नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी यांनी घोषित केले. दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत क्षणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याची नेमके कारण समोर जरी स्पष्ट झालेले नसले, तरी ती गेल्या काही दिवसांपासून होती. हे मात्र स्पष्ट झाले आहे. तिच्या पश्चात वडील सुरेश चौधरी, आई अर्चना, लहान भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे.