पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खोटा चोरीचा आरोप लावल्यामुळे भडगाव येथील एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना कळताच पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अर्नथ टळला.
पोलिसांनी तरुणास ताब्यात घेत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव पेठ मधील रहिवासी लक्ष्मण धुडकू पाटील याचे वर भडगाव येथील एका व्यापाऱ्याने खोटा चोरीचा आरोप लावला असल्याची माहिती लक्ष्मण पाटील याने देत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज ०६ जुलै गुरुवार रोजी ०१:३० वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल सुनील पाटील, पो.कॉ.विनोद बेलदार, सचिन पवार यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील घडणारा अर्नथ टळला. सदर तरुणास ताब्यात घेत पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले.