Home क्राईम ब्रेकींग : डोक्यात लाकडी दांडा टाकून सावत्रआईचा खून; हे होते कारण !

ब्रेकींग : डोक्यात लाकडी दांडा टाकून सावत्रआईचा खून; हे होते कारण !

0
72

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नलंगी येथील तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

सहाबाई शिवराम बारेला (वय-४५, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपक मगन बारेला (वय-२५ ) असे संशयित तरूणाचे नाव आहे. मयत महिला ही संशयित आरोपीची सावत्र आई आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दीपक बारेला हा सावत्रआई सहाबाई बारेला यांच्यासोबत राहतो. सावत्रआईच्या ही चांगली वागणूक देत नसल्याने दिपक कंटाळला होता. त्यामुळे रविवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात संतापाच्या भरात दिपकने सावत्रआईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. संशयीत तरुणाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पेालीसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


Protected Content

Play sound