Home क्राईम ब्रेकींग : सहा बहिणींचा आधार हरपला; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू !

ब्रेकींग : सहा बहिणींचा आधार हरपला; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू !

0
333


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिपनगरजवळ जुन्या महामार्गावर शुक्रवारी १२ सप्टेंबर रेाजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हुजेब राऊत खाटीक (वय १९, रा. वरणगाव) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधारच हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

अपघाताचे नेमके कारण
मिळालेल्या माहितीनुसार, हुजेब नमाज पठण करण्यासाठी पायी जात असताना दिपनगर २१० च्या गेटजवळ असलेल्या एका चिकन दुकानासमोर हा अपघात झाला. एमएच १९ आर ९५२६ क्रमांकाच्या दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, हुजेबचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरू, मदतीची मागणी
या अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून हुजेबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ट्रॉमा सेंटर रुग्णालयात पाठवला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हुजेबच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्याच्या निधनानंतर कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे ग्रामस्थांनी दुःख व्यक्त करत प्रशासनाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound