Home Cities अमळनेर ब्रेकींग : नवजात अर्भक निर्दयपणे फेकून दिल्याने खळबळ !

ब्रेकींग : नवजात अर्भक निर्दयपणे फेकून दिल्याने खळबळ !

0
118

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथे माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना गुरूवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. लोण खुर्द, अमळनेर-मुडी रस्त्यावरील एका बंद घराजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका नवजात मानवी अर्भकाला निर्दयपणे उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. या कृत्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अर्भकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अर्भकाची ओळख पटेनाशी

लोण खुर्द येथील पोलीस पाटील उदय निंबाजी पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी दुपारी ३.४५ वाजता त्यांच्या शेतात काम करत असताना, गावातील एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीस फोनद्वारे कळवले की, कैलास भगवान पाटील यांच्या बंद घरालगत नवजात अर्भक जखमी अवस्थेत पडलेले आहे. पाटील दाम्पत्य तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले असता, ते मानवी नवजात अर्भक होते. धक्कादायक बाब म्हणजे, या अर्भकाच्या पोटाचे लचके तुटलेले असल्याने त्याचे लिंग ओळखता येत नव्हते. हे पाहून त्यांनी तातडीने मारवड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावली आणि अर्भकाला तातडीने ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे रवाना केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती अर्भकाला मयत घोषित केले.
कोणत्यातरी अज्ञात निर्दयी व्यक्तीने या नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून त्याची दुर्दशा केल्याची खात्री झाल्यावर उदय पाटील यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound