जळगाव/भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जाम मोहल्ल्यातील शालिमार हॉटेल समोरील डी.डी. सुपर कोल्ड्रिंक्स व चहाच्या दुकानावर जुन्या वादातून ६ जणांनी गोळीबार करून तेहरीम अहमद नासीर अहमद (वय-३५, रा.मच्छीवाडा,जाम मोहल्ला) याची हत्या करण्यात आली होती. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील सात संशयित आरोपींनी बल्लारशहा आणि मनमाड येथून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल आणि ३ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
अशी आहे घटना :
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तेहरीम अहमद हा तरुण जाम मोहल्यातील शालिमार हॉटेल समोर डीडी सुपर कोल्ड्रिंक्स व चहाच्या दुकानावर शुक्रवारी १० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी जुन्या वादातून संशयित आरोपी तन्वीर माजिद पटेल, अन्वर पटेल, रमिज पटेल, शेख साहिल शेख रशीद, मजीद पटेल, अदनान उर्फ कालिया शेख युनूस सर्व रा. भुसावळ या ६ जणांनी दुकानात घुसून गोळ्या झाडून तेहरिम याची हत्या केली आणि दुचाकी वरून पसार झाले होते. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान याप्रकरणी दुपारी दोन वाजता जाकीर मेहबूब खान (वय-४६, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तन्वीर माजिद पटेल, अन्वर पटेल, रमिज पटेल, शेख साहिल शेख रशीद, मजीद पटेल, अदनान उर्फ कालिया शेख युनूस सर्व रा. भुसावळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांच्या चौकशीला यश; दोन ठिकाणाहून आरोपींना अटक
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखे शाखा अशी दोन पथके रवाना करण्यात आली. गुन्ह्यातील संशयित आरोपी सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल वय-३२, रा.पटेल कॉलनी खडका रोड, भुसावळ हा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल संघपाल तायडे, पोकॉ. सोमवंशी, सचिन पोळ यांनी शनिवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्याला अटक केली, तर गोळीबार करणारे संशयित आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला लागलीस मनमाड येथे रवाना केले. त्यावेळी त्यानुसार रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पथकाने संशयित आरोपी अदनान शेख युनूस वय-२९, शेख साहिल शेख रशीद वय-२१ दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ, अब्दुल नबी हनीफ पटेल वय-३१, आणि सनी मोहम्मद आसिफ वय-१९,दोन्ही रा. जळगाव यांना मनमाड येथून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चार गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील अब्दुल माजीद पटेल यांला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडीसुनावली आहे. इतर आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश धुमाळ, सपोनि अमितकुमार वागुल, पोउनि मंगेश जाधव, पोउनि राजु सांगळे, पोउनि मंगेळ वेंडकोळी, पोहेकॉ विजय नेरकर, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, अनवर शेख, निलेश चौधरी, पो.ना.अतुल पवार, सोपान पाटील, पोशि प्रशांत परदेशी, गजानन देशमुख, जावेद शहा, भुषण चौधरी, योगेश माळी, राहुल वानखेडे, हर्षल महाजन यांनी कारवाई केली आहे.