ब्रेकींग न्यूज : वीज कोसळल्याने दोन जनावरे जागीच ठार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळल्याने शेतात बांधलेले गोऱ्हा आणि एक बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे रविवारी ९ रोजी दुपारी ४ वाजेपासून वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. लोणी बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे येथील शेतकरी किशोर विनायक पाटील यांच्या शेतात वीज कोसळल्याने त्यांच्या मालकीचे एक गोऱ्ह व एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सदरची घटना कळताच गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. परंतु गोऱ्ह व बैल जागीच मयत झाले होते.

याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम पाटील, डॉ. असिफ कुरेशी व त्यांच्या टीमने सदर घटनास्थळी जाऊन जनावरांची पाहणी केली. त्यानंतर मयत गुरांचे शविच्छेदन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे दोन जनावरे दगावली आहेत. शासनाकडून पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

Protected Content