ब्रेकींग न्यूज : तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ तिहेरी अपघातात चोपड्याचे ३ जण जागीच मयत तर ४ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. ओमनी कार आणि दोन दुचाकींचा हा अपघात झाला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व शिवाजी नगर मधील एक असे तिघे मयत झाले आहेत. चार जण जखमी आहेत. टॅक्सी मधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार रा. सुरत या जखमी प्रवाशाला खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले.

चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. सहा जण दोन दुचाकीवर ट्रिपल सीटने मंगरूळ येथून चोपडाकडे जात होते. शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता चोपडे कडून येणारे ओमनी कार क्रमांक एमएच १९ वाय १८२८ ने दोघी दुचाकींना जोरदार धडक दिली.

या अपघातात चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व शिवाजी नगर मधील एक जण असे तीन जण ठार झाले आहेत. ओम्नी कार चालक विजय महाजन आणि ज्ञानेश्वर सोनार या दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Protected Content