Home क्राईम ब्रेकिंग न्यूज : भरधाव डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त नागरिकांनी पेटविला...

ब्रेकिंग न्यूज : भरधाव डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त नागरिकांनी पेटविला डंपर

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा भरदार डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास कालिंका माता चौकात घडली आहे. तर सोबत असलेली त्यांची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला आहे. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, योजेस हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजेस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound