Home क्राईम ब्रेकींग न्यूज : अल्पवयीन मुलगी वाहून गेली ; धक्क्याने आजोबांचा मृत्यू !

ब्रेकींग न्यूज : अल्पवयीन मुलगी वाहून गेली ; धक्क्याने आजोबांचा मृत्यू !

0
157

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी १९ सप्टेंबर दुपारी २ वाजता एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीचा शोध सुरू असतानाच, या घटनेचा धक्का सहन न झाल्याने तिच्या ६५ वर्षीय आजोबांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निकिता भालेराव (वय १५) आणि तिची मामी सरला खरे (वय ३५) या दोघी शेतातून परत येत होत्या. हिवरा नदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघीही वाहून गेल्या. परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत सरला खरे यांना सुखरूप बाहेर काढले, मात्र निकिता पुराच्या पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तीन तासांपासून निकिताचा शोध सुरू आहे.

नातीच्या दु:खाने आजोबांचा मृत्यू
एकीकडे निकिताचा शोध सुरू असतानाच, दुसरीकडे या दुर्दैवी घटनेची बातमी निकिताच्या ६५ वर्षीय आजोबा श्यामराव खरे यांना कळली. नात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा मोठा धक्का त्यांना बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकाच कुटुंबावर दुहेरी दु:ख कोसळले असून, वडगाव टेक गावात शोकाकूल वातावरण आहे.


Protected Content

Play sound