ब्रेकींग न्यूज : शेरा चौकात टेन्ट हाऊसला भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील शेरा चौकातील टेन्ट हाऊसला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी २२ जानेवारी रेाजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. ही आग लागताच जळगाव महानगर पालिकेचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील शेरा चौकातील आरमान टेन्ट हाऊस येथे बुधवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत टेन्ट हाऊसचे साहित्य जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान ही आग लागताच जळगाव महानगरपालिकेचे अग्नीशमन विभागातील बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणावर लोड बाहेर पडत असल्यामुळे नागरीकांची मोठी गर्दी जमली होती.

Protected Content