चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | चौदा हजार रुपयांची लाच घेताना पाट बंधारे विभागातील एका लिपीकला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून सदर इसमावर कार्यवाही सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यावर सदर पथकाने आज सकाळी १०.४० वाजताच्या (वेळ निश्चित नाही) सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान सदर कार्यवाही एसीबीच्या (धुळे) पथकाने केली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.