Home क्राईम ब्रेकिंग न्यूज : निंबोल येथे बडोदा बँकेवर दरोडा ; कर्मचारीची गोळी झाडून...

ब्रेकिंग न्यूज : निंबोल येथे बडोदा बँकेवर दरोडा ; कर्मचारीची गोळी झाडून हत्या

867b8f6c a40f 475e 8ee7 1b3c3e7fd999
867b8f6c a40f 475e 8ee7 1b3c3e7fd999


867b8f6c a40f 475e 8ee7 1b3c3e7fd999

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंबोल येथील पूर्वीची विजया व आताची बडोदा बँकेवर आज दुपारी दोन अज्ञात दरोडेखोरांनी बँक लुटण्याच्या उद्देशाने गोळी झाडून एका कर्मचारीची हत्या केलीय. भरदिवसा आणि भरवस्तीतील बँकेवर दरोडा पडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बडोदा बँकेतील सर्व व्यवहार सुरळीत चालू असताना अचानक दोन अज्ञात तरुण हेल्मेट घालून दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी बँक लुटण्याच्या उद्देशाने गावठी फिस्तुल काढून बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावायला सुरुवात केली.  बँकेचे कर्मचारी करणसिंग यांनी सायरन वाजविण्याचा प्रयत्न करताच एका दरोडेखोराने गोळू मारून त्याची हत्या केली. बँकेत दरोडेखोरांनी तीन गोळ्या झाडल्यामुळे प्रचंड दहशतीचे वातावरण पसरलेले होते. गोळीबारनंतर दोघं दरोडेखोर आपल्या दुचाकीवरून फरार झालेत. दोघं दरोडेखोरांनी बँकेतून किती रक्कम लुटून नेली आली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीय. परंतू या घटनेमुळे घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.


Protected Content

Play sound