ब्रेकींग : नगरपालिका निवडणूक पुढे ढकलावी ही सरकारची इच्छा : मुख्यमंत्री

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची इच्छा असून या संदर्भात आपण निवडणूक आयोगाची बोलणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलली जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कालच राज्यातील ९२ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात यासाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून १८ ऑगस्टला मतदान तर १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे सांगण्यात आले असून आरक्षणीही यानुसारच काढण्यात आलेले आहे.

दरम्यान, या संदर्भात आज दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या पावसाळा सुरू असून अनेक ठिकाण पुरस्थिती आहे. या वातावरणात निवडणुका होऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍नदेखील प्रलंबीत असल्यामुळे निवडणुका पुढा ढकलण्याबाबत आपण निवडणूक आयोगासोबत बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्रीच या निवडणुकीला अनुकूल नसल्यामुळे साहजीकच निवडणुका पुढे जाणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

 

Protected Content