जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी बुधवारी २६ जून रोजी दुपारी ३ वाजता काढले आहे. याकारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवक मिलिंद मिठाराम बाऊस्कर यांनी पदावर कार्यरत असताना मासिक सभेची नोंद प्रोसिडिंग बुकात वेळेवर न घेणे, ग्रामसभेची नोंद न ठेवणे, पाणीपुरवठा योजनेची व ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करून अपहार करणे, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अपहार करणे, इत्यादीप्रमाणे अनियमतता केल्याचे चौकशीअंती दिसून आले आहे. त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी १६ मे २०२४ रोजी सादर केला होता. याबाबतचा पाठपुरावा उपसरपंच अनिल आत्माराम पाटील यांनी केला होता. त्यानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित होती. त्यानुसार बुधवारी २६ जून रोजी दुपारी ३ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ग्रामसेवक मिलिंद बावस्कर यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.