जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा १० कोरोनाबाधीत आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे आता कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १०० इतकी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार, जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील आंबेडकर नगर 21 वर्षीय तरूण, गिरडरोड येथील 49 वर्षीय पुरूष, आंतुर्ली येथील 50 वर्षीय पुरूष अशा तीन तर अमळनेर येथील आमलेशा नगरातील सहा व माळीवाडा येथील एक अशा सात व्यक्तींचा समावेश आहे.
निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील 16, भडगाव येथील एक व अमळनेर येथील एकावण्ण व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 100 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात सर्वात जास्त धोका हा अमळनेरमध्ये असल्याचे दिसून आले. या पाठोपाठ आता भुसावळ व जळगावसह पाचोरा तालुक्यातही या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००