महाविकास आघाडीत बिघाडी; हा पक्ष मविआ सोडण्याच्या तयारीत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. महाविकास आघाडीने यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हापासून कपिल पाटील महाविकास आघाडीवर पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कपिल पाटील यांनी आज राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईत गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमात कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Protected Content