Home क्राईम किरकोळ कारणावरून हाणामारी; पित्यासह मुलाला बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून हाणामारी; पित्यासह मुलाला बेदम मारहाण


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मालखेडा परिसरात मुलाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय पित्यावर संशयितांनी विटांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जंगी छगन जाधव (वय ४५, रा. मालखेडा, ता. जामनेर) यांचा मुलगा दिनेश जाधव याचे गावातील काही तरुणांशी भांडण सुरू होते. ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मालखेडा गावातील खदानीजवळ असलेल्या विटांच्या भट्ट्याजवळ हा वाद झाला. आपला मुलगा वादात अडकल्याचे समजताच जंगी जाधव हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले होते.

मात्र, यावेळी संशयित आरोपी शेखर अशोक पवार, रोहित किसन राठोड, गोलू बद्री राठोड आणि किसन हिरा राठोड यांनी फिर्यादी जंगी जाधव आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयित आरोपी रोहित राठोड याने जंगी जाधव यांच्या डोक्यात वीट मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत ‘तुझ्या मुलाचे हातपाय तोडून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जंगी जाधव यांनी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound