जळगाव, प्रतिनिधी | यंदा घेण्यात आलेल्या १० वी च्या परीक्षेत ब्राह्मण समाजातून मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल तसेच मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल कु.सिद्धी विवेक उपासनी हिचा रविवारी (दि.२२) येथील ब्राह्मण सभेतर्फे अध्यक्ष सुशील अत्रे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येथील धर्मदाय उपायुक्त जी.एस. जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमात १० वी, १२ वी त यश मिळवणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांसह पदवी व पदव्युत्तर परीक्षा, इंजि. डिप्लोमा, सी.ए., वैद्यकीय शाखा, पीएच.डी. अशा विविध शैक्षणिक शाखांमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या ५५ गुणी विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सभेचे उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी व निमंत्रक संदीप कुळकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यकारिणी सदस्य आर.आर. वैद्य, योगेश जोशी, विजय जोशी, अजय डोहोळे, जितेंद्र याज्ञीक, रेखा कुळकर्णी, सौ. जोशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. सूत्र संचालन मीरा गाडगीळ यांनी केले.