जळगाव, प्रतिनिधी | दर वर्षीप्रमाणे या वर्षीही जळगाव इंटेरियर डिझायनर असोसिएशनतर्फे नुकतेच ‘बॉक्स क्रिकेट लीग २०१९’ चे एक दिवसीय आयोजन खान्देश सेंट्रल मॉल येथे करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष इंटेरियर डिझायनर राजेश शर्मा आणि सचिव निलेश कोगटा तसेच ‘जीडा’ चे संचालक मंडळ यांनी हे आयोजन केले आहे.
या अंतर्गत रविवारी (दि.१ डिसेंबर) सकाळी ७.०० ते रात्री ८.०० पर्यंत या मॅचेस घेण्यात येनर आहेत. यास्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून प्रत्येकी टीममध्ये ९ प्लेअर असतील. याप्रमाणे एक दिवसात दोन सत्रामध्ये मॅचेस खेळवण्यात येतील. या क्रिकेट स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ७.०० वाजता सुमित मुथा, आर्की. दिलीप कोल्हे, आर्की. मिलिंद राठी, आर्की. प्रकाश गुजराथी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेला कार्यक्रम नियोजन समिती कलपेन्द्र शर्मा, चेतन संघवी, स्वप्नील शिरुडे आणि मुकेश तोष्णीवाल यांच्यासह अनेक जणांचे सहकार्य तसेच आर्किटेक्ट असोसिएशन, सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, इंटेरियर डिझायनर असोसिएशन यांचे सहकार्य लाभत आहे. या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.