तरूणाच्या हातातील मोबाईल दोघांनी लांबविला

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे स्थानकाजवळ सायकलीने मोबाईलने जात असतांना एका तरुणाचा हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन जणांना चोरून नेल्याची घटना बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दिनेश हरिदास घोडाम सरोज वय-३८, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता तो दुचाकीवरून कामावर जात असताना अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता अडविला व त्यांच्या हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली. त्यांनी आरडाओरड केली परंतु या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

Protected Content