Home Cities भुसावळ रमेश सरकाटे यांच्या कादंबरीस पुरस्कार

रमेश सरकाटे यांच्या कादंबरीस पुरस्कार

0
25

भुसावळ प्रतिनिधी । येथील साहित्यिक रमेश निनाजी सरकाटे यांच्या आयपीएस या कादंबरीला अंकुर साहित्य संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

अकोला येथील अंकुर साहित्य संघातर्फे दरवर्षी चरित्र लेखन, संकिर्ण, नाटीका, प्रवास वर्णन, संशोधन, ललित, कादंबरी, बाल साहित्य या प्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यंदाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात भुसावळात वास्तव्यास असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे यांच्या आयपीएस या पुस्तकाला कादंबरी प्रकारात पुरस्कार जाहीर झाला. मुक्ताईनगर येथे जूनमध्ये होणार्‍या साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound