बोंडअळीचे अनुदान तत्काळ द्या, कासोदा शेतकऱ्यांची मागणी

kasoda

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । प्रशासनाने महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा दुष्काळ जाहीर केला आहे. काही तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. मात्र एरंडोल व धरणगाव तालुका अजूनही अनुदान वाटपापासून वंचित आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रशासनाला आतापर्यंत 3 निवेदन दिले आहेत. परंतू प्रशासनाने यावर कोणतेही पाऊल उचलेले नसून, शेतकऱ्यांनी पुन्हा स्मरणपत्र तहसीलदारांकडे पाठवले आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की, बोंड-अळीच्या अनुदानापासून जे बागायतदार शेतकरी वंचित आहेत. परंतू ज्यांना जिरायतचे अनुदान मिळाले, त्यांना बागायतचे अनुदान लवकर द्यावे. तसेच वर्षे २०१७ साली दुष्काळी मक्का व ज्वारीचे अनुदानापासून जे शेतकरी अजूनही वंचित आहेत. अश्या सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर लाभ मिळावा. अशा मागण्यासाठी तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी जवखेडे सिमचे लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले, माधवराव बापू, आबा राजपूत, गणेश राजपूत, राज राजपूत, ज्ञानेश्वर कँखरे, रतन पाटील, आणि जवखेडे सिम, अंतूर्ली खुर्द आणि तळईचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content