कन्नड घाटात बोलेरो कार दरीत कोसळली; एक ठार, तीन जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कन्नड घाटात फिरायला गेलेल्या चार तरुणांच्या कारला अपघात झाला असून, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त बोलेरो कार चाळीसगावकडे परत येत असताना कन्नड घाटातील एका वळणावर “यू-टर्न” घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दरीत कोसळली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. जखमींना तातडीने चाळीसगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाहन बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि रेस्क्यू टीम कार्यरत आहे. उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती.

Protected Content