बोदवड प्रतिनिधी । शहरात भर दिवसा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरात दिनांक १० रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास विद्या कॉलोनी येथील रहिवासी प्रदीप सुकाले व श्याम नगर मधील मुक्ताई मंगल कार्यालयाजवलील रहिवासी दिवानसिंग नवलसिंग पाटील या दोघांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी हात मारला. त्यांनी कुलुप कडी कोंडा तोडून घरात शिरून कपाट तोडून २ लाख ६७ हजार रुपये अन्ह्यात चोरट्याने लंपास केले.
या प्रकरणी प्रथम खबर देणार प्रदीप समाधान सुकाले यांचे आई वडील बहिणीच्या बाळंतपणासाठी पुणे येथे गेले असता व पत्नी रक्षाबंधनाच्या सणासाठी मुलांसह नाशिक येथे माहेरी गेली असता प्रदीप सुकाळे हे एकटे घरी होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास जलचक्र येथे नातेवाईकांच्या अंतविधी साठी गेले होते. शेजारी राहणार्या सरला बढे या शेजारील महिलेने फिर्यादी यांना फोन लावून सूचना दिली की त्यांच्या घरात चोरी झालेली आहे.
दरम्यान, यासोबत दिवानसिंग नवलसिंग पाटील राहणार श्याम नगर मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ यांच्या कडे देखील चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी लागलीच पोलिस स्टेशन गाठले यात प्रथम फिर्यादी प्रदीप समाधान सुकाळे यांच्या घरातून चोरीस गेलेली रक्कम २ लाख ५७ हजार रुपये आहे. तर दिवानसिंग पाटील यांच्या घरातून चोरीस गेलेली रक्कम ८ हजार रुपये इतकी आहे.
या अनुषंगाने अज्ञान चोरट्यांविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी प्रदीप सुकाळे व दुसरा खबरी दिवानसिंग पाटील यांच्या खबरी वरून गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.