…आणि रोहिणीताई खडसे यांनी स्वत: केली शेतात पेरणी !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी आज चक्क एका शेतात तिफनवर पेरणी केली असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पावसाने आठ दिवस दडी दिल्यानंतर शनिवारला समाधानकारक पाऊस झाल्याने रविवार रोजी तालुक्यात सर्वत्र शेतकर्‍यांची सोयाबिन, उडीद, मुग ,भुईमुग पेरणीची लगबग दिसली जागोजागी शेतात शेतकरी तिफन द्वारे पेरणी करताना दिसत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रविवारी बोदवड तालुक्यात असताना शेलवड येथे तुकाराम धनु बोदडे हे आपल्या शेतात पेरणी करत असताना रोहिणी खडसे यांना दिसल्या नंतर त्यांनी शेतात जाऊन बियाणे हातात घेऊन तिफन मागे पेरणी केली.

रोहिणी खडसे या एकनाथराव खडसे यांच्या कन्या असून शेती हा पिढीजात व्यवसाय असुन ते पारंपरिक शेतकरी आहेत. आतासुद्धा ते आपल्या शेतात नवनविन प्रयोग करून पिके घेत असतात त्यांचा मुळ पिंड शेतकर्‍याचा असल्याने परिवारातील सदस्यांची देखील शेतीशी नाळ जुडलेली आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांना शेतातील कामे काही नविन नाही. त्यांना बालपणापासून शेतीची शेतातील कामांची ओळख असल्यामुळे त्यांनी व्यवस्थितपणे तिफन मागे सोयाबिन बियाण्यांची पेरणी केली.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या बालपणापासून शेती मातीशी नाळ जुळलेली असल्याने शेतातील कामांची सवय असल्याने शेतात पेरणी सुरू असल्याचे बघून पाऊले आपोआपच शेताकडे वळली व बियाणे हातात घेऊन तिफन मागे पेरणी केली. बळीराजाने आता पेरणी केली असुन वरुण राजाने कृपा करावी व धरणी हिरवीगार होऊन यंदाच्या हंगामात शेतकर्‍यांच्या अंगणात धन धान्याचा राशी लागव्यात व शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी काळ्या आईच्या चरणी प्रार्थना केली असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, पेरणी साठी बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवानी सजगता बाळगावीतसेच पाऊस विजांचा कडकडाट सुरू असताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले. तसेच त्यांनी शेतकरी बांधवांच्या पेरणी संबंधी अडीअडचणी,बियाणे खतांची उपलब्धता याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी रामदास पाटिल, कैलास चौधरी, किशोर गायकवाड,विजय चौधरी, प्रदिप बडगुजर, किरण वंजारी, दिलीप पोळ उपस्थित होते.

Protected Content