मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या बोदवड येथील नगराध्यक्षा आणि १० नगरसेवकांनी आज मुंबई येथील कार्यक्रमात हाती शिवबंधन बांधले आहे. हे सर्व नगरसेवक एकनाथराव खडसे यांचे समर्थक असल्याने आ. चंद्रकांत पाटील यांनी खडसेंसह भाजपलाही जोरदार धक्का दिला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
यंदाच्या मार्च महिन्यात जळगाव महिन्यात जळगाव महापालिकेतील भाजपमध्ये उभी फूट पडून शिवसेनेने सत्ता काबीज केली होती. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस मुक्ताईनगर येथील दहा नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. हे सर्व जण खडसे समर्थक असल्याने खळबळ उडाली होती. यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजून काही नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याचा दावा केला होता.
या अनुषंगाने आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बोदवड येथील नगराध्यक्षा श्रीमती मुमताज बी सईद बागवान आणि १० नगरसेवक अशा एकूण अकरा जणांनी हाती शिवबंधन बांधले आहे. हे सर्व जण एकनाथराव खडसे यांचे समर्थक होते. खडसेंच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत जाण्याऐवजी त्यांनी शिवसेनेचा मार्ग निवडला आहे. यामुळे आजच्या पक्षांतराचा खडसेंसह भाजपलाही धक्का बसल्याचे मानले जात आहे.
हा प्रवेश सोहळा मातोश्री येथे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे , राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री,जळगांव ना.गुलाबरावजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील ,गटनेता तथा शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष मोरे ,मुकेश वानखेडे, आरिफ आझाद , दीपक संतोष माळी, अफसर खान , जमील बागवान, मोहसीन बागवान, रितेश सोनार आदींची उपस्थिती होती.