बोदवड प्रतिनिधी । बोदवड ते साळशिंगी या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी विनोद पाडर यांनी दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, बोदवड ते साळशिंगी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वारंवार अपघात घडतात. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर धड चालता देखील येत नाही. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, यासाठी विनोद पाडर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदन दिली. मात्र, अद्यापही दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून १३ मार्चला सकाळी १० वाजता खड्ृडे पडलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन करणार असल्याची माहिती पाडर यांनी दिली.
या रस्त्यावर अलीकडेच ठेकेदाराने माती-मुरूम टाकून थातूरमातूर डागडुजी केली होती. मात्र, आठवड्यातच वार्यासोबत माती वाहून गेली. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे येथून ये-जा करणार्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याचमुळे पाडर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.