बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या १३ प्रभागांसाठी ७४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून १३ डिसेंबर पर्यंत माघारीची मुदत असून यानंतर लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
येथील नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून २१ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १५१ अर्ज दाखल झाले होते. पण रात्री उशीरा ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेल्या चार प्रभागांची निवडणूक आता शासनाच्या निर्णयानंतर होणार आहे. त्यामुळे आता १७ प्रभागांपैकी केवळ १३ प्रभागांमध्येच निवडणूक होणार आहे. यासाठी दाखल १५१ अर्जांपैकी १३ प्रभागांसाठी ७४ विधी ग्राह्य रीतीने नाम विशिष्ट उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. छाननीत ४० अर्ज बाद ठरवण्यात आले. दरम्यान १३ डिसेंबर ही माघारीसाठी अंतिम मुदत असल्याने आता या ७४ अर्जांपैकी किती अर्ज शिल्लक राहतात, हे समजणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, छाननी नंतर प्रभाग क्रमांक एकमध्ये ४ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक चारमध्ये ५ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक पाचमध्ये ८ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक सहामध्ये ६ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक सातमध्ये ४ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक आठमध्ये ८ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक नऊमध्ये पाच अर्ज वैध, प्रभाग क्रमांक १० मध्ये ५ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ६ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक १२ मध्ये ८ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक १३ मध्ये ७ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक १४ मध्ये ४ अर्ज वैध, प्रभाग क्रमांक १६ मध्ये ४ अर्ज वैध, अशा पद्धतीने एकूण ७४ अर्ज वैध ठरले आहेत. ७ डिसेंबर अखेर दाखल झालेले अर्ज १५१ होते. त्या अर्जांपैकी प्रभाग क्रमांक २, ३, १५ व १७ या प्रभागांसाठी एकूण ३७ अर्ज दाखल झाले होते. पण तेथील निवडणूक सध्या स्थगित करण्यात आली आहे.