जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगाव अनुयश आरोग्य प्रतिष्ठान पुणे व जळगाव पीपल बैंक ट्रस्ट संचालित छत्रपति शाहू महाराज हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमानाने मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा सामान्य रूग्णालयातील ब्लॅड बँकेचे सुपरवायझर डॉ. लक्ष्मीकांत लाठी यांची उपस्थिती होती. त्यांनी उपस्थिती रूग्णांनी मधुमेह का होतो. व त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
140 रूग्णांनी केली मधुमेहाची तपासणी
शिबीरात तज्ञ शाहिद खान यांनी रूग्णांची तपासणी केली. मधुमेह तपासणी शिबीरात जवळपास 140 रूग्णांनी तपासणी करून घेतली. या शिबीरच्या आयोजन व शिबीरच्या मार्गदर्शनासाठी जेसीआय जळगावचे अध्यक्ष जेसी प्रतिक गुजराथी यांनी केले. प्रकल्पप्रमुख जेसी भाग्येश त्रिपाठी त्यांचा अनमोल सहकार्य लाभला. शिबीर यशस्वितेसाठी आयपीपी जेसी वरुण जैन, पूर्व अध्यक्ष जेसी रफीक शेख, जेसी अबसाहेब पाटिल, जेसी सैय्यद अल्ताफ अली, सेक्रेटरी जेसी मोइन अहमद, जेसी प्रमोद गेहलोत, जेसी आकाश जैन, जेसी विक्की पिपरिया, जेसी प्रतीक बोरदिया यांची उपस्थिति व सहकार्य लाभले.
पहा । रूग्णांची तपासणी करतांना आरोग्य अधिकारी