यावल प्रतिनिधी । येथील बोरावल गेट लोणारी वाड्यातील ग्रामीण रुग्णालय व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बरेला यांच्या मार्गदर्शनाखली संयुक्त विद्यमाने आज जागतिक महिला दिनानिमित्त रक्तगट तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार बेबाताई धनगर ह्या होत्या. तसेच कार्यक्रमात माता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे बेबाताई धनगर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच यावल ग्रामीण रूग्णालय यावलचे समुपदेशक वसंतकुमर संदानशिव यांनी उपस्थितांना महिलांना जागतिक महीला दिनाविषयी व कोराना विषाणुसंसर्ग या आजाराविषयी माहिती दिली.
तसेच डोंगर कठोरा येथील सामाजीक कार्यकर्ते अशोक तायडे यांनी महिलांना कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी व महिला कायदे विषयी माहिती दिली. रवींद्र माळी यांनी रक्त संकलन केले त्यात ३५ महिलांनी स्वइच्छेने रक्तगटाची चाचणी करवून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुधाकर धनगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कविता लोणारी, निर्मला लोणारी, मीना पाटील सुरेखा लोणारी उज्वला महाजन पौर्णिमा झांबरे, पौर्णिमा धनगर, रूपाली धनगर, छाया लोणारी, मौसमी धनगर, वंदना लोणारी, पद्मावती पाटील, रेखा लोणारी, सुधाकर धनगर आदी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.