चोपडा प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे कस्तुरबा हायस्कुल येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
जळगाव जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले. शिबिराचे उद्घाटन करताना ऍड संजय पाटील यांनी सोनियाजी गांधी यांच्या कार्याचा गौरव करून सोनियजींना शुभेच्छा दिल्या रक्तदान शिबिरात एन.एस. यु.आय चे विद्यार्थी प्राध्यापक काँग्रेसचे कार्यकर्ते आदींनी रक्तदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी डॉक्टर उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेजच्या टीमने रक्त गोळा केलेले उत्कृष्ट रक्तदानाबद्दल मेडिकल टीमचे डॉक्टर नितीन भारंबे यांनी गोदावरी फाउंडेशन तर्फे मेमोंटो देऊन एडवोकेट संदीप पाटील यांचे अभिनंदन करुन सत्कार केला यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील शहर काँग्रेसचे अध्यक्ष के.डी चौधरी, एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुरेश सिताराम पाटील डॉक्टर पृथ्वी मजल कोळी डॉक्टर ममता चांदवानी डॉक्टर सईद शेख अहमद सचिन आत्माराम साळुंखे लक्ष्मण पाटील नंदकिशोर सांगोरे दिपाली बांगडे तेजस्वी नागपुरे गोपीचंद रघुनाथ चौधरी चंद्रशेखर मधुकर पाटील अशोक साळुंखे राजेंद्र भास्करराव पाटील शहर महिला अध्यक्षा सौ सुप्रिया ताई सनेर सूतगिरणीचे संचालक भागवतराव पाटील प्राध्यापक प्रदीप पाटील घनश्याम पाटील डॉक्टर अकबर पिंजारी इलियास पटेल परेश पाटील पंकज पाटील कल्याण पाटील रोहित पाटील मनोहर पाटील भाग्यश्री कपादने आरिफ शेख आदींनी परिश्रम घेऊन जातीने हजर होते.