जळगाव, प्रतिनिधी । लोकनेते माजी महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जन्मदिनानिमित्त आज मंडल क्र. ६ रामानंद परिसरातर्फे महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
एमजे कॉलेजजवळील अस्वाद चौक येथे मंडल क्र. ६ चे ७० कार्यकर्ते व नागरीकांना रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे व जळगाव महानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आलं.
यावेळी जिल्हा महानगरचे सरचिटणीस महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, म.न.पा सभागृहात नेते ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती सुचीता हाडा, म.न.पा गटनेते भगत बालाणी, जिल्हा उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, नगरसेविका गायत्री राणे, दीपमाला काळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, सौ नीला चौधरी, वंदना पाटील, मंडळाचे अध्यक्ष अजित राणे, सरचिटणीस अक्षय चौधरी, चिटणीस रेखा पाटील, युवा मोर्चाचे महानगर कोषाध्यक्ष ऋषिकेश येवले, पंकज सनांसे, जयश विसपुते, अमित शिंदे, अजय चौधरी यांच्यासह मंडलातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.