यावल, प्रतिनिधी ।कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावात रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या रक्ताचा साठा हा अत्यल्प असून रक्ताची गरज भागविण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज गुरुवार २३ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीत जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे , जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र ( छोटु ) पाटील , जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव , पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी , माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल गोवींदा पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी आदी पक्षाच्या पदाधिकारी यांनी या रक्तदान शिबीरास भेट दिली. या रक्तदान शिबीरात युवकांचा मोठा सहभाग दिसुन आला असुन दुपारपर्यंत एकुण ३५ जणांनी या शिबीरात रक्तदान केले. रक्तसंकलनाकरीत माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगावचे तंत्रज्ञ विलास सपकाळे, मदतनिस रामचंद्र पोतदार व सागर खर्चाने यांनी कार्य केले. रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे , नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे , युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रितेश बारी , युवा मोर्चाचे सरचिटणीस व्यंक्टेश बारी, युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस परेश नाईक , सागर कोळी, भुषण फेगडे , हेमन्त चौधरी आदींनी कामकाज पहिले.