


जळगाव प्रतिनिधी । शहरात भारतीय एकता सद्भावना मिशन, रेड प्लस ब्लड बँकतर्फे तांबापुर येथे न्यु अपार्टमेंट जवळील पटेल गल्लीत आज दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘रक्तदान शिबीर’ घेण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या कार्यक्रमाला अध्यक्ष ईकरा एज्यु. सोसा. अलहाज अ. करीम सालार, जिल्हा अध्यक्ष भाजपा मा.अशोक लाडवंजारी, प्रदेश अध्यक्ष B.E.S.M.अमजद पठान, सर्कल अधिकारी महसुल योगेश नन्नवरे, समाजसेवक हाजी वाहेद खान, डॉ. मिनाज पटेल, अय्युब बागवान, अलीमभाई शेख, ईस्माईल शाह एजाज शेख, रईसभाई खाटीक, जहरभाई खाटीक, अनवर शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते. तर कार्यक्रम आयोजक जिल्हा अध्यक्ष भारतीय एकता सद्भावना मिशनचे जमील उस्मान शेख, ॲड. मिर नाजीम अली, हाजी युसुफ शेख (नगरसेवक) होते.


