खाजगी डॉक्टरांनो…आता तुम्हीच तुमचे रक्षक ! (Blog)

कोरोनाच्या लढाईत शासकीय डॉक्टर्ससोबत खाजगी डॉक्टर्सचे योगदानही कुणी नाकारू शकणार नाही. तथापि, राज्य सरकारने खाजगी डॉक्टरांना कोरोना योध्दे मानण्यास नकार दिला असून त्यांना विमा कवच नाकारण्यात आले आहे. या संदर्भात भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. निलेश तुकाराम (उर्फ नि. तु. ) पाटील यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर एका पोस्टच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.

करोना महामारी मध्ये जे जे करोना योद्धे आहेत त्यांना केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाखाचा विमा जाहीर केला त्यात कोण कोण योद्धे लाभार्थी आहेत ते आता सर्वांना माहिती आहे…!

या लढाईत जेवढी शासकीय डॉक्टरांचे योगदान आहे. त्याचबरोबर खाजगी डॉ. यांची रुग्ण सेवा नाकारता येणार नाही, शेवटी सर्व शासकीय रुग्णालय हे कॉविड उपचार केंद्र झाल्याने इतर रुग्णांना दिलासा होता तो खाजगी डॉक्टरांचाच…!

आता बातमी वाचली,करोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टर मंडळींचे विमा कवच नाकारले…!

आता पहा,
१. करोना काळात खाजगी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरू ठेवावी म्हणून राज्य सरकार डॉक्टरांना ताकीद देते.
त्यांचे रजीस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देते. पण डॉक्टर मात्र जीवाशी गेल्यावर राज्य शासन मात्र हात वर करते…!

२. महाराष्ट्र शासन दररोज किती ताप,सर्दी,खोकला यांचे रुग्ण बघितले याची आकडेवारी मागते. तेव्हा डॉ. मंडळी यांनी असें रुग्ण पहायचे आणि विमा देतांना मात्र ते खाजगी सेवा देता अस म्हणत हात वर करायचे….!

३. खाजगी डॉक्टर मंडळींना गावागावात तपासणी करायला लावायचे, माहिती संकलित करायची,उपचार द्यायचे आदी कामे करून घेतली आणि आता विमा प्रश्‍न आला तर हात वर करतात…!

४. खाजगी डॉक्टर मंडळींना कॉविड केंद्र मध्ये ड्युटी करण्यासाठी विनंती करायची, पण त्यांच्या जीवाची आणि परिवाराची हमी देतांना मात्र हात वर करायचे..!

५. जेव्हा सरकारी रुग्णालयात जातांना रुग्ण घाबरत होते तेव्ह याच खाजगी डॉक्टर मंडळींनी तो भार उचलला. रुग्ण सेवा सुरू ठेवली आणि आता मात्र विमा देण्यासाठी हात वर करतात…!

राज्य सरकार म्हणते,ते खाजगी सेवा करत होते आणि त्याचे त्यांनी फीस घेतली आहे. तेव्हा विमा नाकारण्यात येत आहे…!

कोणत्या सुपीक डोक्यातुन हा अफलातून युक्तिवाद आला आहे…?

आता खाजगी डॉ. फीस घेतात मग सरकारी डॉक्टर का मोफत सेवा देत आहे का? पगार कोण घेतो? यांचा जीव हा जीव आणि खाजगी डॉक्टरांचा जीव हा हवेचा बुडबुडा, उडाला तर उडाला…!

त्यांना कोरोना लागण झाली, मृत झाले तर विमा कवच आणि खाजगी डॉक्टर यांचा करोना काही वेगळा आहे का? उलट यांच्यामुळे च तुमच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे जनतेसमोर कमी आले…!

खाजगी डॉक्टर यांचा जीव हा मातीमोल वाटतो का? त्याला संसार नाही,परिवार नाही,त्याची हमी द्यायला नको पण त्यांची सेवा मात्र हवी ….!

लाज वाटायला हवी, लाज …!

पण ह्या कोरोनामुळे तुमची कातडी जाड झाली आहे…!

एवढे मनाचे कोडगे झाले आहे तुम्ही…!

सर्व डॉक्टर मंडळींनी खाजगी सेवा दिली. गावागावात शिबीरे घेतली. ह्या कठिण काळात ते घरात बसून नव्हते, जबाबदारी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरू ठेवली…!त्यांच्यावर बंधन नव्हते पण नैतिक जबाबदारी होती ती त्यांनी स्वीकारली पण आता मात्र तुम्ही त्या शहीद डॉक्टर परिवाराला वार्‍यावर सोडता ..!

योजना केंद्र सरकारची आहे,हप्ते केंद्र सरकार भरणार आहे,विमा कवच विमा कंपनी देणार आहे…राज्य सरकारला फक्त प्रस्ताव तयार करणे आणि केंद्राकडे पाठवणे. त्यात पण त्यांना खाजगी डॉक्टर मंडळींच्या पाठीशी उभे राहता येत नाही…!

उद्या पासून जर डॉक्टर मंडळींनी असहकार आंदोलन उभारले, सर्व खाजगी रुग्ण सेवा बंद केली,

सर्व मेडिकल दुकाने बंद झाली.

तर काय कराल,तेव्हा हे पाप तुमचे असेल हे लक्षात ठेवा…!

वंदनीय बाबा आमटे यांचे एक वाक्य आहे.

माणसाला शरीराचा कुष्ठरोग झाला तर तो बरा होतो,पण मात्र त्याला मनाचा कुष्ठरोग झाला तर तो कधीही बरा होत नाही. तेव्हा ह्या महाराष्ट्र शासनाला मनाचा कुष्ठरोग झाला आहे…!

डॉ. नि. तु. पाटील, भुसावळकर

८०५५५९५९९९

Protected Content