कोवळया खांद्याला जबाबदारीच भान…! (Blog)

भुसावळ येथील डॉ. निलेश तुकाराम (उर्फ नि.तु.) पाटील हे दैनंदिन जीवनातील स्पंदने टिपून याबाबत सोशल मीडियात भाष्य करत असतात. या अनुषंगाने जीवनातील कठोर परिस्थितीशी दोन हात करत शिकणार्‍या एका मुलाबाबतचा त्यांनी लिहलेला अनुभव आपल्यासाठी सादर करत आहोत.

संघर्ष हा प्रत्येकाच्या भाग्यात असतो आज मला तर उद्या तुम्हाला, पण त्या “संघर्षा'” नंतर जे सध्या होईल ते नक्कीच “अप्रतिम” असेल…!

आज जळगावला माझी चारचाकी घेण्यासाठी गेलो होतो, नियमित सर्व्हिस करून घेण्यासाठी गाडी साई मारुती सर्विस सेन्टर ला दिली होती.

भुसावळ ते डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज रिक्षा ने गेलो नंतर हॉस्पिटलच्या गाडीने जळगाव, जळगांव ला भास्कर मार्केट समोर गाडी उभी असतांना एका बारीक अंगकाठी असलेल्या मुलाने गाडीच्या खिडकी च्या काचेवर टक टाक केलं,मी काच खाली केला,तो म्हणाला, “साहेब, चिकी घ्या,सोनपापडी घ्या,माझ्याकडे 6 ते 8 प्रकारच्या चिकी आहेत….” त्याचा आवाज गोड होता,त्याच्या हातातली साधी पिशवी बघितली, तोंडावर मास्क पाहिला,त्याच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा जाणवला. मला सोनपापडी फार आवडते, म्हटलं दे 1पुडा,आणि 2,3 प्रकारच्या चिकी घेतल्या…!

त्याला सहज नाव विचारले,शुभम नरेंद्र सोनार ,जळगावला संभाजी नगर मध्ये राहतो ,बाबांना 2014 पासून लखवा झाला. ते घरीच पलंगावर पडून असतात. आई घरी पापड,केळी वेपर्स तयार करून विकते करते,मी आता 11 वीला एम. जे. कॉलेजमध्ये जात असून मी फावल्या वेळेत दारोदार, रस्त्यावर चिकी विकतो आणि माझा लहान भाऊ प्रथमेश हा पण चौथी पासून चिकी विकतो. आता तो 8वी मध्ये आहे आणि असे आम्ही परिवारासाठी पैसे जमा करतो…..!

नंतर मी विचारलं, तुझ्याकडे पुस्तक आहेत का? हो मला जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी कॉलेजमध्ये भरती करून दिले,त्याचा खर्च त्यांनी केला. शिवाय त्यांनीच माझ्या बाबांच्या उपचारासाठी मदत केली. आणि माझी शाळेची फी, क्लास ची फी आणि पुस्तके मला जळगावचे डॉ. राजेश डाबी (मेंदू विकार तज्ञ) यांनी दिली आहेत, त्याच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा पाहून मी आणखी सोनपापडी आणि चिकी विकत घेतली…,!

त्याचा परवानगीने मी त्याचा फोटो घेतला,मोबाईल नंबर घेतला आणि भुसावळ च्या परतीच्या प्रवाशाला लागलो…!

रस्त्यात तोच विचार……!
परिस्थिती नाजूक आहे,
शिक्षण करण्याची जिद्द आहे,
त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे किंबहुना करत आहे,
तळहातावर पोटाची शांती आणि बुद्धीची भूक मिटवत आहे,
लहान भाऊ पण शिक्षण आणि तुटपुंजी कमाई करत आहे,
आई पण तेच,
पण ठाम आहे ती जिद्द,
मी लढणार,
मी शिकणार,
मी नक्कीच जिंकणार….!

आणि ह्याच जिद्दीला मला सलाम करावयास वाटतो,नाहीतर थोडे काही मनाविरुद्ध झाले तर टोकाचा निर्णय घेणार महाभाग आपण पाहतो. त्यांच्या समोर हा 16 वर्षाचा तरूण योध्या नक्कीच उजवा ठरतो….!

शुभम जिद्दी आहे,गरज आहे ती फक्त पाठीवर हात ठेउन लढ म्हणा, असे म्हणण्याऱ्या शाश्वत हाताची…!

शुभम तुझ्या नावाप्रमाणेच तुझ्या जीवनात सर्वकाही शुभ होईल, जळगाव चे लोकप्रिय आ राजुमामा भोळे आणि डॉ. राजेशजी डाबी यांचे लाख-लाख आभार ज्यांमुळे शुभम ची शिक्षणाची तहान भागवली जात आहे…!

शुभम च्या महत्वाकांक्षी नजरेत बघुन मला ‘ये जवानी है दिवानी’ मधील डायलॉग आठवला,

मै उठना चाहता हूं, दौडना चाहता हूं,गिरना चाहता हूं, बस रुखना नहीं चाहता…

(माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे,मी शुभम सोनार चा मोबाइल नंबर देत आहे,कृपया हात जोडून विनंती आहे, जळगाव गेल्यास शुभम ला फोन करा आणि नक्की चिकी, सोनपापडी आदी विकत घ्या आणि त्याला मदतीचा हात द्या… @ )

Contact : शुभम सोनार 93223 06065

© डॉ. नि. तु. पाटील,भुसावळकर

8055595999

Protected Content