जळगाव : धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी व जालना येथील आमरण उपोषण करते दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन बुधवार, १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. हे आंदोलन सकल धनगर समाजाचे नेते अरविंद देशमुख,जळगाव जिल्हा धनगर महासंघ मल्हार सेनेचे माजी सरसेनापती सुभाष सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश धनगर समाज महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

दिपक बोराडे हे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील आरक्षणाच्या त्वरित अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषण पुकारले आहे. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा म्हणून जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघाच्या पदाधिकारी एकत्र येत आपली भूमिका ठामपणे मांडली.

याप्रसंगी धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी, मल्हार सेना कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते तसेच अहिल्या महिला संघाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना शासनाने तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगर जमातीच्या ऐतिहासिक व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना एस.टी. आरक्षण देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. समाजातील युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत असलेली असंतोषाची भावना लक्षात घेता शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी प्रभाकर न्हाळदे (अध्यक्ष धनगर समाज बोर्डिंग जळगाव),अरुण ठाकरे प्रदेश सदस्य, धर्मा सोनवणे, डॉ. संजय पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मल्हार सेना, दिलीप धनगर जिल्हाध्यक्ष धनगर समाज महासंघ, गणेश बागुल जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना जळगाव, संतोष कचरे जिल्हा सरचिटणीस कर्मचारी संघटना, तुळशीराम सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना, महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष प्रमिला, शहराध्यक्ष मंदाकिनी पाचपोळ, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती वाघ, शोभा मोते, हेमा सोनवणे, योगिता बागुले, आशा कचरे, संध्या कणखरे, ज्योती चिंचोरे, माधुरी न्यायदे, अविनाश भालेराव, डिगंबर सोनवणे,प्रवीण पवार,सचिन धनगर,महेंद्र सोनवणे,यशवंत शिरोळे, प्रभू शिरोळे, कुणाल सुलताने,विष्णुअप्पा चिंचोरे,अनिल मनोरे,मधुकर सोनवणे,रामचंद्र निळे, प्रमोद कचरे,रामभाऊ, कचरे,प्रमोद सोनवणे,बनसोडे सर,सुरेश धनगर, उत्तम धनगर, सुनील खोमणे,सुनिल लांडगे, प्रवीण पाचपोळ, शैलेश धनगर, सचिन हडप, मयूर ठाकरे,आदी पदाधिकारी व समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



