जळगाव (प्रतिनिधी) जैन उद्योगसमुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसा निमित्त रविवारी सायंकाळी शहरातील भाऊंचे उद्यानात जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व अमृतधारा फाउंडेशनतर्फे मुशयराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जळगाव,मालेगाव, कासोदा, नगरदेवला येथील कवी-शायर यांचा सहभाग होता.राष्ट्रीय एकता व भारताला बलवान करण्यासाठी कोणते प्रयत्न व्हावे हे कवींनी सादर केले.
सर्व प्रथम नाट्य कलावंत संदीप मेहता यांच्या हस्ते शमा प्रज्वलित करून मुशयरा चे उदघाटन करण्यात आले त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दलीचंद जैन,राष्ट्रवादीचे अध्यक्ष गफ्फार मलिक,इकराचे अध्यक्ष करीम सालार,मेमन बिरादरीचे मजीद झकेरीया,शंभू पाटील,आर्किटेक्ट शिरीष बर्वे,कॅप्टन कुलकर्णी,बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख व फाउंडेशन च्या अद्यक्षा डॉ प्रियांका सोनी व्यासपीठावर उपस्थित होते. संदीप मेहता यांनी आज समाजात व देशास एकात्मतेची आवश्यकता असून अशा कार्यक्रमाने ती कटुता कमी होते व असे कार्यक्रम होणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. फारूक शेख यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला करीम सालार,गफ्फार मलिक यांची समयोचित भाषणे झाली.
मुशयरा मध्ये सर्व शायर नी चांगली कविता सादर केली त्यात जळगावचे अक्रम कुरेशी,नगरदेवळाचे जुबेर अली ताबिश यांनी मोठया प्रमाणात दाद मिळविली. तर इर्शाद अंजुम,जुबेर अली ताबिश,फरहान दिल, मुश्ताक साहिल,मोबिन राही,साबीर आफाक,इकबाल असर,शकील अंजुम,वकार सिद्दीकी,सईद जीलानी,अक्रम कुरेशी, रफिक पटवे,पुरोषत्तम पाटील,रमेश लाहोटी,डॉ प्रियंका सोनी”प्रीत”यांनी सुद्धा उपस्थितांची मने जिंकली. मुशयरा ची निजामत इर्शाद अंजुम मालेगाव चे शायर यांनी तर आभार फारूक शेख व अयाज मोहसीन यांनी मानले. मुशयरा यशस्वीतेसाठी जावेद अन्सारी व कासीम रफिक यांनी चांगले कार्य केल्या बद्दल त्यांचा सत्कार दलीचंदजी जैन यांच्या हस्ते करण्यात आला.