Home राजकीय मोदींच्या सभेत काळा शर्ट,रुमालच नव्हे तर काळ्या बनियनवरही बंदी?

मोदींच्या सभेत काळा शर्ट,रुमालच नव्हे तर काळ्या बनियनवरही बंदी?


अहमदनगर (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेत काळा शर्ट,रुमालच नव्हे तर काळ्या बनियनवरही बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मोदींची सभा होत आहे. मात्र या सभेसाठी काळ्या कपड्यांवर बंदी घातल्याची माहिती आहे. जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत आहे, त्याला सभास्थळी प्रवेश दिला जात नाहीय. खिशात काळ्या रंगाचा रुमाल तर नाही,हे सुद्धा तपासले जात आहे. कहर म्हणजे काळ्या रंगाची बनियनवरही बंदी घालण्यात आली असल्याचे वृत्त हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’ने दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound