यावल प्रतिनिधी । ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत झालेल्या गोंधाळावरुन तालिका अध्यक्षकांनी विरोधी पक्षातील १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबीत केले. यांच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी आज मंगळवारी ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी ५ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार व विरोधी पक्ष नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर सत्ताधारी व विरोधाकांमध्ये जोरदार चकमक झाली. यात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकाने तालीबानी पध्दतीने लोकशाही मुल्य पायदळी तुळवून भारतीय जनता पार्टीचे १२ आमदार १ वर्षासाठी निलंबित केले आहे. त्याचा यावल तालुका भारतीय जनता पार्टी निषेध व्यक्त करत आहे. माजी आमदार गिरीष महाजन यांच्यासह इतर आमदारांना सन्मानपुर्व निलंबन मागे घ्यावे असे न झाल्यास भविष्यात भारतीय जनता पार्टी तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले आहे.
या निवेदनावर जि.प.सभापतील रविंद्र पाटील, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, शरद महाजन, हर्षल पाटील, सविता भालेराव, रमेश फेगडे, गणेश नेहते, नारायण चौधरी, पुरूणित चौधरी, योगेश भंगाळे, दिपक पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, उमेश पाटील, राकेश फेगडे,, विजय पाटील, सागर कोळी, लहू पाटील, साहेबराव बडगुजर, बबलू धारू, अतूल भालेराव, प्रकाश चौधरी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.