वरणगाव दत्तात्रय गुरव | ‘माजी मंत्री, आ. गिरिश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मोक्का लावण्याचे कटकारस्थान रचणाऱ्याची सीबीआय चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे,’ यामागणीसाठी वरणगाव बसस्टँड चौक येथे भाजपाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे..
सरकारी वकिलांनी भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन यांच्यावरती कटकारस्थान रचत मोक्का लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पोल-खोल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. गिरीश महाजन यांच्यावरमोक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक झाली पाहिजे. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील बस स्टॅन्ड चौकांमध्ये व वरणगावच्या पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.