जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तात्कालिन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी पध्दतीची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा निषेध करत भारतीय जनता पार्टीचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात शनिवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शास्त्री टॉवर चौकात निषेध आंदोलन करण्यात आला.
तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी पध्दतीची भरती करण्याचा निर्णय त्यांच्या काळात घेतला होता. भरती प्रक्रिया राबवण्याचा कंत्राट नऊ खासगी कंपन्यांना देण्यात आली होती. या शासन निर्णयाला राज्यातून तीव्र विरोध केला जात होता. या निर्णयामुळे बेरोजगार तरूणांची फसवणूक केली जात असल्याचे आरोप केले जात होते. दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकारने नुकताच हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या अनुषंगाने कंत्राटी पध्दतीने भरती करण्याच्या निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालया ते शास्त्री टॉवर पर्यंत मोर्चा काढून टॉवर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचे पहायला मिळाले. आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, माजी उपमहापौर सुनिल खडके, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका चित्रा काळे यांच्यासह भाजपाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.