Home Cities जळगाव निवडणुकीसाठी भाजपची जय्यत तयारी ; कार्यालयात इच्छुकांच्या रांगा !

निवडणुकीसाठी भाजपची जय्यत तयारी ; कार्यालयात इच्छुकांच्या रांगा !

0
139

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारांची निवड प्रक्रिया गतिमान केली आहे. पक्षाने सोमवारी १५ डिसेंबर रोजी शहरातील जी.एम. फाउंडेशन भाजपा कार्यालयात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची कसून चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने इच्छुक संभव्य उमेदवारांशी संवाद साधला आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची प्रक्रिया पार पडत आहे. या चाचपणीदरम्यान इच्छुकांचा जनसंपर्क, पक्षासाठी केलेले कार्य आणि निवडणुकीत विजय मिळवण्याची त्यांची क्षमता या निकषांवर तपासणी केली जात आहे. या मुलाखती सत्राला संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन लड्डा यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी संभाव्य उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या भूमिका आणि योजना जाणून घेतल्या.

गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या प्रतिनिधींनी मुलाखतीसाठी आलेल्या अनेक उमेदवारांशी संवाद साधला असता, त्यांनी प्रभागात आपल्या कार्याचा आणि विजयाच्या आत्मविश्वासाचा पुनरुच्चार केल्याचे पहायला मिळाले.


Protected Content

Play sound