रावेर-यावलमध्ये भव्य उत्साहात साजरा होणार भाजपाचा स्थापना दिन : आ. अमोल जावळे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाजपा ध्वजवंदन आणि समाजोपयोगी उपक्रमांनी दिवस उजळून निघणार असल्याची माहिती आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी दिली.

भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने सकाळी यावल, साकळी आणि न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये भाजपाच्यावतीने रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
दुपारी यावल येथील शेतकी संघ कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभू श्रीराम नवमी व भाजपा स्थापना दिनानिमित्त यावल तालुक्यात विविध ठिकाणी सत्यनारायण पूजा होणार आहे:
यावल मंडळ: संध्या ५ वाजता, आयोजक – तालुकाध्यक्ष उमेश फेगडे
फैजपूर मंडळ (न्हावी): संध्या ६.३० वाजता, आयोजक – नितीन चौधरी व यशवंत तळेले
किनगाव-साकळी मंडळ: संध्या ५ वाजता, आयोजक – रवींद्र सूर्यभान पाटील

तसेच रावेर तालुक्यातील रावेर पूर्व, रावेर पश्चिम आणि सावदा मंडळांमध्येही सत्यनारायण पूजा संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमोल जावळे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात उमेश फेगडे (तालुकाध्यक्ष), विलास चौधरी (सरचिटणीस) व उज्जैनसिंग राजपूत (सरचिटणीस) यांचा सक्रिय सहभाग असून, संपूर्ण तालुक्यात भाजपाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

 

Protected Content