इचलकरंजी । सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. आशिष शेलार यांच्या हातून सत्तासुंदरी गेली आहे. त्यामुळे शेलारसह त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे. भाजप नेत्यांना ध्यानीमनी नुसती सत्ताच दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
आशिष शेलार यांची स्वत:ची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरांसारखी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी शरद पवारांचे पाय चाटण्यासाठी कोण गेले होते? असा सवाल शेट्टी यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहोत, ते अदानी-अंबानीसाठी लढा देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.