अमळनेर, प्रतिनिधी । देवस्थाने भाविकांसाठी दर्शनास खुली करण्यात यावी या मागणीसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात भाजपतर्फे वाडी चौकांत घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेली देवस्थाने आणि धार्मिक स्थळे बंद आहेत. तर दुसरीकडे मॉल, मांस मदिरा चालू आहे. त्यामुळे ही देवसथाने सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आज शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी भाजपातर्फे “दार उघड उद्धवा दार उघड” असे म्हणत जोरदार घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,माजी सभापती श्याम आहिरे,सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, बबलू राजपूत, राहुल पाटील,माजी शहराध्यक्ष शितल देशमुख, दिपक पाटील, महेश पाटील, दिपक पवार, तुळशीराम हटकर, योगीराज चव्हाण, पंकज भोई, कल्पेश पाटील, राहुल चौधरी, बाळा पवार, आयज बागवान, समाधान पाटील,कुंदन पाटील, मुशाईद शेख, निखिल पाटील,राहुल कंजर आदीउपस्थित होते.