Home प्रशासन नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन

0
31


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईडीने अटक केलेले अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलीक यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी आंदोलन केले आहे.

काल चहापानावर बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे.

नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत. नवाब मलिक दाऊदचे दलाल आहेत अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे.

 


Protected Content

Play sound