रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तर्फे लाडू वाटून तसेच फटाके फोडून रावेर लोकसभेला रक्षाताईं खडसे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाची शाप्थ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्रिमंडळात भारत देशाची केंद्रीय राज्यमंत्री म्हणुन रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी शपथ घेतली. हा आम्हा सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज प्रवर्तन चौक,मुक्ताईनगर येथे घोषणाबाजी करत फटाके फोडून तसेच लाडू वाटून विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content