चोपडा प्रतिनिधी । नंदुरबार लोकसभा निवडणुकीबाबत आपण कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी केले आहे.
याबाबत वृत्त असे की, समाजमाध्यमांमध्ये माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्याबाबत वृत्त प्रचारित करण्यात आले होते. यात त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदादरसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार के.सी. पाडवी हे एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार आहेत यात शंकाच नाही. मात्र भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ असा दावा केल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि, आपण असे कोणत्याही स्वरूपाचे वक्तव्य केले नसल्याचे प्रतिपादन अमरिशभाई पटेल यांनी केले आहे. यामुळे संबंधीत वृत्त खोडसाळपणाचे असल्याचीही स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.